कोरोनामुळे दिवाळीत चालणारे व्यवसाय ठप्प; व्यावसायिक हवालदिल

मुंबई | कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता हळूहळू ही प्रक्रिया अन् अनलॉककडे जाताना दिसतं आहे. मात्र या लॉकडाऊनच्या कालावधीपासून अनेक घटकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रामुख्याने हंगामी व्यवसायांवर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे संक्रांत आली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणात चालणारे सर्वच व्यवसाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ठप्प झाल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. दिवाळीच्या दिवसात अनेकजण हंगामी व्यवसाय करत असतात मात्र यावर्षी त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

दिवाळी सणानिमित्त फराळ, फाटके, शोभेच्या वस्तू, कपडे, इमिटेशन ज्वेलरी, आकाश कंदील, वेगवेगळ्या प्रकारच्या विजेची आकर्षक तोरणे, रांगोळी, पणत्या, सजावटीचे सामान, अशा व्यवसायत अनेक जण छोटीमोठी गुंतवणूक करून पैसे मिळवत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

याचबरोबर दिवाळीच्या काळात फटाक्याचा व्यवसाय करणाऱ्या अमित जाधव यांनी सांगितले की, या वर्षी ऑर्डर्स आल्या नसल्याने त्यांनी मालच मागवला नाही. तर दुसरीकडे वेगवेगळ्या पणत्या आणि रांगोळी साहित्य व्यवसाय करणाऱ्या मानसी परब यांनीसुद्धा या वर्षी आपल्या व्यवसाय न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या संकटात दिवाळी कशी साजरी करावी यासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर दिवाळी यंदा साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करतानाच अनेक महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या
पेन्शनधारकांना बँकेत जाण्याची गरज नाही! ऑनलाइन पद्धतीने जमा करा जीवन प्रमाणपत्र
BCG vaccine : कोरोनावर ‘ही’ लस ठरतीये परिणामकारक, श्वसनाच्या त्रासावर उपयुक्त
आता Whtasapp वरूनही पाठवता येणार पैसे; जाणून घ्या सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.