दिलासादायक! देशभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाचा वेग मंदावतोय!

मुंबई | सर्वत्र कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील विक्रमी वाढ होताना पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे कोरोना विषाणू वरील लस तयार करण्यासाठी अनेक देश रात्रंदिवस काम करत आहे.

याचबरोबर कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अनेक ठिकाणी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तसेच कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने चार कोटींचा टप्पा पार केला आहे.

अशातच आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या या आकडेवारीने मोठा दिलासा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे ३८,३१० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४९० व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ८२,६७,६२३ वर पोहोचली आहे.

दरम्यान, कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरात ७६ लाखांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे आता जवळपास ९० टक्के झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कोण अब्दुल सत्तार? काय करतो?, नारायण राणेंच्या जिभेवरचा ताबा सुटला
दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…
तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.