चिंतेत भर! करोनाच्या लक्षणांमध्ये बदल; नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष

मुंबई | देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. याचबरोबर दिवसेंदिवस करोनाच्या लक्षणांमध्ये बदल होताना दिसत आहे. अशातच आता एका नव्या अभ्यासातून चिंतेत भर पडणारी माहिती समोर आली आहे.

जर्मनीमधील बर्लिन येथील चारिटे युनिर्व्हसिटी मेडिसीन संस्थेनं केलेल्या संशोधनाचा अहवाल नेचर न्युरोसायन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अभ्यासात करोना विषाणू नाकावाटे मेंदू शिरकाव करू शकतात, अशी भीती एका संशोधकांनी व्यक्त केली आहे.

तसेच यासाठी संशोधकांनी करोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांच्या मेंदूचा अभ्यास केला. या अभ्यासात श्वसन नलिकेशी जोडलेल्या घशाच्या वरच्या भागात परिक्षण करण्यात आले. तसेच एका रुग्णांचे मृत्यूवेळी वय ७१ होते. करोनाची बाधा झाल्यानंतर ३१ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे संशोधकांनी सांगितले.

घरामध्ये कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त…
जे लोक घरात राहतात त्यांना बाहेर असणाऱ्या लोकांपेक्षा कोरोना व्हायरसचा धोका हा अधिक असतो. लंडनच्या इंपिरियल कॉलेजच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संसर्गाची लक्षणे पाहताच त्या व्यक्तीने किंवा रुग्णाने स्वतःला वेगळे केले पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

तसेच कोरोनाची बाधा झालेले व लक्षणे दिसत असलेले रुग्ण लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक धोकादायक असू शकतात. सिम्प्टोमिक रुग्ण असिम्प्टोमिक रुग्णांपेक्षा चार पटीने जास्त कोरोनाचा प्रसार करू शकतात, असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.

संशोधनातून हाती आलेल्या माहितीनुसार संशोधक सांगतात की, कामाच्या ठिकाणी किंवा सार्वजनिक ठिकाणांपेक्षा घरांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. पाच दिवसांच्या लक्षणांमध्ये कुटुंबातील एका सदस्याकडून दुस-या कुटुंबातील सदस्याकडून संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
प्रताप सरनाईकांचा क्वारंटाईन कालावधी संपला; गुरुवारी ईडीसमोर हजर होणार?
शीतल यांच्या आत्मह.त्येनंतर आमटे कुटुंबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
बीएचआर घोटाळा प्रकरणाचे पुरावे आहेत; एकनाथ खडसेंचा गौप्यस्‍फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.