कोरोनाचा लवकरच गेम ओव्हर! शास्त्रज्ञांनी शोधले स्वस्त आणि मस्त गुप्त हत्यार, जाणून घ्या…

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश कोनाचा सामना करत आहे दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती तसेच यामध्ये अनेकांचे मृत्यू देखील झाले आता मात्र दुसरी लाट कमी होताना दिसत आहे यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

असे असताना आता कोरोनाला हरवण्यासाठी शास्त्रज्ञांनी नवा उपाय शोधून काढला आहे. कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटी-कोविड नॅनोबॉडीज सोडून त्या माध्यमातून कोरोनाचा खात्मा करण्याची पद्धत शास्त्रज्ञांनी शोधली आहे. यामुळे ही एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

यामध्ये रुग्णाला अँटीबॉडी नाकावाटे शोषून घ्याव्या लागतील. म्हणजे श्वासावाटे नॅनोबॉडीज शरीरात जातील. ही उपचार पद्धत कोरोनाविरोधात गुप्त हत्यार म्हणून काम करेल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यामुळे याचा फायदा होणार आहे.

हा प्रयोग केल्यानंतर त्यामुळे कोरोना पसरण्याची प्रक्रिया निष्क्रिय होणार आहे. या उपचार पद्धतीचा शोध युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी लावला आहे. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

याचा पहिला प्रयोग संशोधकांनी हॅमस्टर नावाच्या प्राण्यावर करून पाहिला आहे. हॅमस्टर उंदरांच्या प्रजातीमधील एक जीव आहे. नव्या उपचार पद्धतीत नॅनोबॉडीज एखाद्या मोनोक्लोनल एँटीबॉडीजसारखे काम करतात. यामुळे आता लवकर उपचार होण्यास मदत होणार आहे.

कोरोना महामारीत हे एक वरदान ठरणार आहे. याबाबत लवकरच पुढील प्रयोग केले जाणार आहेत. यामुळे येणाऱ्या काळात कोरोनाला हरवण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी ही एक साधी सोपी आणि सुलभ उपचार पद्धती आहे.

ताज्या बातम्या

भररस्त्यात गोळीबार करुन डॉक्टर दाम्पत्याची हत्या; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर

वडील सावत्र आईचं नाव काढत नाही; तर दुसरीकडे नातू कौतूक करता करता थांबत नाही

प्रेरणादायी! अवघ्या ४ वर्षांची चिमुकली एक पाय नसताना चढली उंच ढीगारा, पहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.