मुंबई | कोरोनाच्या महामारीचा अटकाव करण्यासाठी लसीकरणाच्या मोहिमेची तयारी चालू आहे. परंतु ब्रिटेनमधुन चिंताजनक बातमी समोर आली होती. तेथे कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन करण्यात आले. असाच एक स्ट्रेन मुंबईच्या खारघर सेंटरमधल्या तीन रुग्णांमध्ये दिसून आला आहे. हा E484K म्यूटेशन व्हायरसचा दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या स्ट्रेनशी संबंध लावला गेला आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार झालेल्या एंटीबॉडी या नव्याने आलेल्या कोरोनाच्या स्ट्रेनशी लढण्यास निष्क्रीय ठरत आहे. चिंताजनक बाब म्हणजे नवा स्ट्रेन हा ब्रिटनचा नसून तो दक्षिण आफ्रिकेतील असल्याचा संबध तज्ञांनी लावला आहे. व्हायरसच्या जेनेटिक सीक्वेंसमध्ये बदल होत आहे. परंतु आफ्रिकेतील या स्ट्रेनविरुद्ध लढण्यासाठी एंटीबॉडी निष्क्रीय ठरत असल्याचे दिसुन येत आहे.
टाटा मेमोरियल सेंटरच्या डॉ. निखिल पाटकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या व्हारसमध्ये तीन प्रकारचे म्यूटेशन्स नोंदवण्यात आले आहेत. यापैकी एक हा आफ्रिकेतील स्ट्रेन आहे. सेंटरच्या टीमने ७०० रुग्णांचे सॅम्पल घेतले होते.
ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनपेक्षा आफ्रिकेतील स्ट्रेन आधिक धोकादायक असल्याचे बोलले जाते. परंतु घाबरण्याचे काही कारण नसल्याचे मत तज्ञांनी नोंदवले आहे. याबाबत बोलताना बेंगळुरुचे साथीच्या रोगाचे तज्ञ डॉ. गिरधर बाबू म्हणतात की, ज्या तीन रुग्णात हा नवीन स्ट्रेन आढळला त्यापैकी दोन आयसोलेशनद्वारे बरे झाले आहेत. तर एकाला रुग्णालयात व्हेंटिलेटरची गरज भासली नाही.
आरोग्याच्या बाबतीत उद्भवलेल्या कोरोनासारख्या वैश्विक साथीच्या आजार संकटातून सावरत असताना आणखी काळजी घेणे गरजेचे आहे. लसीकरणापर्यंत जास्तीची खबरदारी घेण्याची गरज आहे. भारतीय नागरीकांनी न घाबरता स्वत:ची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केल्यास लवकरच आपण सर्व या संकटातून बाहेर पडू. दरम्यान कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! ब्रिटनहून आलेले पाच करोना पॉझिटिव्ह विमानतळावरून झाले फरार
मुहूर्त ठरला! देशभरात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण
कोरोना लसीच्या दोन डोसांमध्ये अंतर का ठेवतात? ‘हे’ आहे कारण
आज संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम; पहा कसं आहे प्लॅनिंग