बॉलीवूडवर कोरोनाचे संकट! कलाकारांना विकावी लागली प्रॅापर्टी; काहींनी तर मुंबईच सोडली

मुंबई : देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. राज्यात देखील आता कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. सर्वच घटकांना कोरोना विषाणूचा मोठा फटका बसला आहे. या काळात हाताला काम नसल्याने सर्वसामान्य जनतेसोबतच कलाकारांना देखील मोठा आर्थिक संकटांचा सामना करावा लागतं आहे.

तर दुसरीकडे या संकट काळात अनेक छोट्या कलाकारांनी स्वप्नांची नगरी असलेल्या मुंबईला निरोप दिला आहे. काही स्टार्सनी त्यांच्या घराची सुरक्षा कमी केली, तर डिझायनर कपड्यांची मागणी देखील निम्म्यावर आली आहे.

याबद्दल बोलताना अभिनेता पीयूष मिश्रा म्हणतात की, “संघर्ष करणार्‍या आणि दैनंदिन मिळकत मिळणाऱ्या कलाकारांची अवस्था वाईट आहे. काही लोकांनी त्यांची प्रॉपर्टी देखील विकली आहे. माझ्या आजूबाजूचे बरेच कलाकार खर्च परवडत नाही म्हणून मुंबई सोडून आपल्या शहरात परतले आहेत.”

दरम्यान, कॉस्ट्यूम डिझायनर अंजू मोदी म्हणतात की, “प्रत्येक दिवशी मला कलाकारांच्या ड्रेसच्या ऑर्डर मिळायच्या, पण कोरोनाकाळात सर्व थांबले आहे. ऑर्डर ५० % आहेत, यामुळे मला माझा स्टाफ ५० % कमी करावा लागला आहे.”

मात्र काही मोजकेच असे स्टार्स असे आहेत की त्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे फारसा परिणाम झाला नाही. मात्र उर्वरित बॉलीवूड इंडस्ट्रीवरला कोरोनाचे मोठे संकट आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रॉडक्शन हाऊस, थिएटर आणि मल्टिप्लेक्स २०२१ मध्ये पुन्हा चालू झाले. मात्र ते पूर्व पदावर येणार इतक्यातच कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण बॅालिवूड इंडस्ट्रीला भोगावा लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

देशात कोरोनाचा हाहाकार; पहील्यांदाचा रूग्णसंख्येने केला एक लाखांचा आकडा पार

धक्कादायक! अक्षय कुमार पाठोपाठ आता ‘या’ दोन प्रसिद्ध सेलिब्रिटींना कोरोनाची लागण

अनिल देशमुख ही मोगलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील; उच्च न्यायालयाने दिले सीबीआयला चौकशीचे आदेश

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.