काळजी घ्या! हिवाळ्यामध्ये कोरोना साथीची दुसरी लाट येणार; तज्ञांचा दावा

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. रूग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर कोरोना रूग्नांचे मुत्यू प्रमाण देखील वाढत आहे. अजूनही कोरोना विषाणू वरील लस तयार करण्यात कोणत्याच देशाला यश मिळालेले नाही.

याच पार्श्वभूमीवर केंद्राने या साथीसंदर्भात नेमलेल्या शास्ञज्ञांच्या समितीने म्हटले की, ‘फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास रूग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते, अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

तसेच नियमांचे नीट पालन न केल्यास सणासुदीच्या दिवसांत रूग्ण संख्या आणखी २६ लाखांनी वाढण्याचा धोका असल्याचे शास्ञज्ञांच्या समितीने म्हटले आहे. याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे शास्ञज्ञांनी म्हटंले आहे.

दरम्यान, सध्या नवराञ सुरू आहे. पुढे दसरा, दिवाळी हे मोठे उत्सव आहेत. या सणांच्या कालावधीत आपण सोशल डिस्टन्स, मास्क, स्वछता, सॅनिटायझरचा वापर करावा असे तज्ञांनी सांगितले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मागील काही आठवड्यांत दिवसभरात १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रविवारी ११,२०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १३ लाख ६९ हजार ८१० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
आयपीएलमध्ये खेळवावी लागली चक्क ४४ ओव्हर्सची मॅच; का कराव लागलं असं? वाचा..
एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले
म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण
फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.