फेब्रुवारीपासून कोरोनाची साथ उतरणीस लागणार; केंद्राच्या समितीचा अंदाज

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. रूग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचबरोबर कोरोना रूग्नांचे मुत्यू प्रमाण देखील वाढत आहे. अजूनही कोरोना विषाणू वरील लस तयार करण्यात कोणत्याच देशाला यश मिळालेले नाही.

याच पार्श्वभूमीवर केंद्राने या साथीसंदर्भात नेमलेल्या शास्ञज्ञांच्या समितीने म्हटले की, ‘फेब्रुवारीत ही साथ उतरणीला लागली तरी काळजी न घेतल्यास रूग्णांची एकूण संख्या १.६ कोटीपर्यंत पोहोचू शकते, अशी भिती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

तसेच नियमांचे नीट पालन न केल्यास सणासुदीच्या दिवसांत रूग्ण संख्या आणखी २६ लाखांनी वाढण्याचा धोका असल्याचे शास्ञज्ञांच्या समितीने म्हटले आहे. याचबरोबर हिवाळ्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे शास्ञज्ञांनी म्हटंले आहे.

दरम्यान, सध्या नवराञ सुरू आहे. पुढे दसरा, दिवाळी हे मोठे उत्सव आहेत. या सणांच्या कालावधीत आपण सोशल डिस्टन्स, मास्क, स्वछता, सॅनिटायझरचा वापर करावा असे तज्ञांनी सांगितले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मागील काही आठवड्यांत दिवसभरात १० हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात रविवारी ११,२०४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १३ लाख ६९ हजार ८१० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या
पाटलांना राष्ट्रवादीमध्ये आता एन्ट्री नाही, दिल्या घरी सुखी रहा; शरद पवारांचा टोला
रस्ता वाहून गेला तरीही फडणवीस बांधावरुन चिखल तुडवत शेतकऱ्याच्या भेटीला..
मुख्यमंत्री गावातच आले नाही तर नुकसान दिसणार कसे; पुलावर बोलावल्याने ग्रामस्थ संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.