नागपुरात भोंदुबाबाचा पर्दाफाश; नागीण डान्स करून कोरोना रुग्णांवर करत होता उपचार

नागुपर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले  आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन कठोर निर्बंध घालत आहे. तरीही रुग्ण संख्या कमी होत नसल्याचं दिसून येत आहे.

कोरोना बरा करण्यासाठी अनेक उपाय सांगितले जात आहेत. एका डॉक्टरने तर दारू पासून कोरोना बरा होत असल्याचं सांगितलं आहे. तर एका मंत्र्याने यज्ञ केल्यास कोरोनाची लाट येणार नाही असं सांगितलं आहे. असं असतानाचं नागुरमधील एका बाबाचा कारनामा समोर आला आहे.

नागपुरच्या पंचशील नगरमध्ये ३२ वर्षीय शुभम तायडे उर्फ गुणवंत बाबा आपला दरबार भरवत होता. नागासारखा डान्स करून आपण कोरोना रुग्णांना बरं केलं असल्याचा दावा हा ढोंगी बाबा करत होता. त्यामुळे त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांची संख्याही मोठी होती.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि  जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत या भोंदुबाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून पोलिस अधिक तपास करत आहेत.

कोरोना रुग्णांना बरं करण्याच्या नावाखाली तायडे हा गोरगरीबांची फसवणूक करत होता. तसेच गुप्तधन शोधणे, पैशाचा पाऊस पाडणे ,अशी कामंही करून हा लोकांना लुबाडत होता. मात्र पोलिसांना समोर या बाबाचा ढोंगीपणा चालला नाही.

बाबाच्या दरबारात पोलिस गेले असता पोलिसांना ५० पेक्षा जास्त भक्त तिथे दिसले. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी बाबा नागासारखं जमीनीवर आळोखेपिळोखे घ्यायचं फुसफुस करायचा. पोलिसांना पाहताच नाग बाबा शांत झाला.

इकीकडे कोरोनाच्या लसी मिळत नसल्याने रुग्णांचा जीव जात आहे. वैज्ञानिक कोरोनावर उपाय शोधत आहेत. अशातच  ढोंगी बाबा लोकांची फसवणूक करून लुबाडत असल्याने राज्यात संतापाची लाट पसरली आहे. या बाबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
जेव्हा सचिनने आणि सेहवागने ड्रेसिंगरूममध्ये केली होती गांगुलीची फजिती, किस्सा वाचून पोट धरून हसाल
सैराटफेम आर्चीला मनापासून आवडतो ‘हा’ अभिनेता, स्वत: तिनेच उघड केलं गुपित, नाव ऐकून थक्क व्हाल!
घरकाम करणाऱ्या महिलेच्या आकांताने पोलिसांनाही फुटला पाझर; वाचा पुर्ण किस्सा
बहिणीचं कोरोनाने निधन झाल्यावर भावाचे डोळे फिरले; बहिणीचे १२ लाखाचे दागिने आणि पैसे हडपले

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.