मोदी सरकारची मोठी घोषणा; कोरोना योध्द्यांना मिळणार सरकारी नोकरीत प्राधान्य

नवी दिल्ली | देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पावलं उचलत आहे.

कोरोनाची लाट आल्यापासून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नर्स जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांनी केलेले काम कधीही न विसरण्यासारखे आहे.

अशातच केंद्र सरकारने  कोरोना योध्यांसाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोरोनाच्या काळात कोविड ड्युटी बजावणाऱ्या वैद्यकीय  कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देणार आहेत. त्यासाठी कोरोना योध्द्याने १०० दिवस ड्युटी पुर्ण केली असली पाहिजे. या कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारच्या वतीने कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले बीएससी/ जीएनएम परिक्षा उत्तीर्ण असलेल्या नर्सला कोविड नर्सिंग ड्युटीवर लावण्यात येणार आहे. या नर्स वरिष्ठ डॉक्टर आणि वरिष्ठ नर्स यांच्या देखरेखेखाली कोरोना रुग्णांसाठी काम करतील. तसेच कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा लागू करण्यात येईल. असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३ लाख ६८ हजार १४७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आजवरचा आकडा २ लाख १८ हजार ९५९ वर जाऊन पोहोचला आहे.

महत्वाच्या बातम्या-
पराभूत झालो तरी संपलो नाही; पुढच्या वेळी पराभवाचे उट्टे काढील; भगीरथ भालकेंचा निर्धार
पाॅझीटीव्ह बातमी: ११ जणांच्या कुटुंबातील सर्वांना कोरोना; ‘अशी’ केली घरच्या घरी कोरोनावर मात
रेमडेसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या पत्रकारासह वॉर्डबॉयच्या टोळीला पोलिसांनी केली अटक
कोरोनाकाळातील ठाकरे सरकारचे काम हे कौतूकास्पद;भाजप खासदाराची ठाकरे सरकारला शाबासकी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.