मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरू आहे. जगभरात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव असून अमेरिका, ब्राझील आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रूग्ण संख्येच्या पटीत रूग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
अशातच चीनधील संशोधकांनी एक खळबळजनक दावा केला आहे. चीनची अकादमी ऑफ साय़न्सेजच्या वैज्ञानिकांनी हा जावईशोध लावला आहे. त्यांनी सांगितले की भारतात २०१९ च्या उन्हाळ्यात हा व्हायरस जन्माला आला होता. चीनच्या एका वृत्तपत्रामध्ये याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
चीनच्या एका वैज्ञानिकाने भारतातूनच कोरोना महामारी जगभरात पसरल्याचा आरोप पुढे म्हटंले आहे की, वुहानमध्ये जो व्हायरस सापडला तो खरा व्हायरस नव्हता. हा व्हायरस बांगलादेश, अमेरिका, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, भारत, इटली, झेक प्रजासत्ताक, रशिया किंवा सर्बियामध्ये जन्माला आल्याचे त्यांनी म्हटंले आहे.
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा कोरोना प्रादुर्भावात वाढ होत असून आजही कोरोना रुगणांची संख्या 6 हजारांपेक्षा जास्त आढळून आली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी ४ हजार ८९ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ७२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे; बॉक्सर विजेंदर सिंग म्हणतोय, ‘अण्णा हजारे आता कुठे आहात तुम्ही?
पंढरीचा पैलवान गेला! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तडफदार आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन
अर्णब गोस्वामींचा जामीन वाढवत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दिला झटका, म्हणाले…