‘कोविशिल्ड’ लस तिसऱ्या टप्प्यात! पुण्यात ‘या’ दिवसापासून मिळणार डोस

मुंबई : सर्वत्र कोरोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णांच्या मृत्यू संख्येत देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे.

याचबरोबर अजूनही कोरोना विषाणूवर ठोस लस मिळालेली नाही. मात्र चिंतेची गरज नाही, याचे कारण असे की, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने निर्मिती केलेली “कोविशिल्ड” लसीचे काम तिसऱ्या टप्प्यात आहे. याचबरोबर ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्रॉझेनेका कंपनीकडून या चाचणीच्या जगभरात चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

याचबरोबर ससून रुग्णालयात ‘कोविशिल्ड’ या कोरोनावरील लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला उद्यापासून सुरूवात होणार आहे. ससूनकडून स्वयंसेवकांची नावनोंदणी सुरू करण्यात आली आहे. येत्या उद्यापासून पुण्यात ससूनसह ४ हॉस्पिटलमध्ये डोस दिले जाणार आहेत.

तसेच, यापूर्वीच भारती व केईएम रुग्णालयामध्ये या लसीच्या चाचण्या सुरू झाल्या आहेत. तसेच दोन महिन्यांत कंपनी लसीच्या किंमतीबाबत माहिती देणार आहे. लसीच्या निर्मितीसाठी सीरम आणि ऑक्सपर्ड विद्यापीठात यापूर्वीच करार झाला आहे.

दरम्यान, ‘या वर्षाच्या अखेरीस कोरोना विषाणूची लस येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असा दावा पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केला आहे. या लसच्या १०० कोटी डोसच्या उत्पादनासाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन आणि गवी यांच्याशी करार केला आहे, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून मिळाली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूडचे ‘हे’ सात कलाकार गोत्यात! ड्रग्ज पार्टी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल
खळबळजनक! त्या पार्टीमध्ये दिशावर झाला सामूहिक बलात्कार; प्रत्यक्षदर्शीचा खुलासा
या झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख आणि २४ तास कडक पहारा; काय खास आहे या झाडामध्ये?सुशांत आणि रियाचा ‘तो’ व्हिडीओ झाला व्हायरल; समोर आले ‘ते’ कृत्य

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.