रशियात कोरोना लस ‘मोफत’ उपलब्ध होणार; मात्र WHO सह अन्य देशांची ‘ही’ शंका कायम

 

मॉस्को | जगभरात या कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे लक्ष कोरोनाच्या लसीकडे लागलेले आहे.

आत या कोरोना लसीबाबत असणारी सर्वांची प्रतिक्षा संपणार आहे. आता रशियाने तयार केलेल्या कोरोनावरील लसीला आरोग्य मंत्र्यांलयाचीही मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती स्वतः रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज (मंगळवारी) दिली आहे.

तसेच ही लस रशियामध्ये ‘विनाशुल्क’ उपलब्ध होईल. यावरील खर्च देशाच्या अर्थसंकल्पातून दिला जाणार आहे. मात्र उर्वरित देशांची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही, अशी माहिती टीएएसएस या रशियन एजन्सीने दिली आहे.

अनेक देशांना ही लस पुरवण्यासंदर्भातही रशियाने भाष्य केले आहे. ते सप्टेंबर महिन्यापासून लसीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायला सुरुवात करणार आहे. तसेच ऑक्टोबर पूर्वीच लसीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.

ही लस मॉस्कोच्या गामलेया इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. मात्र, लसीची मानवी चाचणी केवळ २ महिन्यांमध्येच संपवल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावर अनेक शंका उपस्थित केल्या आहेत.

दरम्यान, रशियाने कोरोनावरील यशस्वी लस तयार केल्याचा दावा केला असला तरी, या लसीकडे जगभरातील अनेक देश संशयाच्या नजरेने बघत आहेत. या लसीबाबत काही देशांकडून बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.