पहिल्या डोसनंतर ‘या’ कोरोना लसीतून जास्त अँटीबॉडीज तयार होतात; ICMR च्या प्रमुखांचा दावा

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसाला लाखोंच्या संख्येने रुग्ण सापडत आहे. त्यामुळे वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

आता १८ वर्षांवरील नागरीकांनाही कोरोनाची लस देण्यात येत आहे. सध्या भारतात नागरीकांना दोन प्रकारच्या लसी दिल्या जात आहे, एक भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि दुसरी सिरमची कोविशिल्ड. त्यामुळे कोणती लस जास्त प्रभावी आहे. अशी चर्चा सुरु आहे.

असे असतानाच आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनी एक मोठे विधान केले आहे. कोणत्या लसीने जास्त अँटीबॉडीज तयार होतात. याबाबत डॉ. भार्गव यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर कोव्हॅक्सिनपेक्षा जास्त अँटीबॉडीज तयार होतात, असा धक्कादायक दावा इंडियन काउंसिल ऑफ मेडीकल रिसर्चचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी केला आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींच्या लसीकरणानंतर अँटीबॉडीज विषयी त्यांनी हा दावा केला आहे.

कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर पुरेशा अँटीबॉडीज तयार होत नाही. तर दुसरा डोस घेतल्यानंतर पुरेशा अँटीबॉडीज तयार होतात. हे नव्या अभ्यासातून उघड झाले आहे. तर या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर चांगल्या प्रकारे अँटीबॉडीज तयार होतात, असे बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले आहे. ते अंतर १२ ते १८ आठवड्यांपर्यंत करण्यात आलेले आहे. त्याबद्दल बोलताना, पहिल्या डोसनंतर अँटीबॉडीज चांगल्या तयार होत आहे. त्यामुळे तीन महिन्यांचे अंतराचा परीणाम चांगला दिसून येईल, असे डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

नाबालिक मुलीसोबत लग्न करत होता साऊथचा ‘हा’ सुपरस्टार; पोलीसांनी थांबवले लग्न
अरे वा! कोरोना लस घेतल्यानंतर केंद्र सरकार देतंय ५ हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया
‘तेव्हा मला ड्रायव्हरसमोर जायलाही लाज वाटायची’; व्हायरल क्लिपवर राधिकाने सांगितला अनुभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.