‘या’ कारणामुळे भारतात कोरोना लस घेण्यासाठी घाबरताहेत लोक; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची माहिती

मुंबई | मोठ्या प्रतीक्षेनंतर जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरण मोहीमेला अखेर सुरुवात झाली आहे. देशातील नामवंत अशा सीरम आणि भारत बायोटेक या दोन संस्थांनी अनुक्रमे कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन या नावाने या लसीची निर्मिती केली आहे. आज भारतातील कोरोनाविरूद्ध लसीकरण मोहिमेचा सातवा दिवस आहे.

याबाबत आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशभरात आतापर्यंत आठ लाख सहा हजार लोकांना लसी देण्यात आली आहे. जरी काही ठिकाणी लसीचे काही दुष्परिणाम देखील पाहिले गेले आहेत, जे अत्यंत सामान्य आहेत, असे देखील सांगण्यात आले आहे.

तसेच पुढे बोलताना आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन म्हणतात, ‘लसीकरण हे करोनाच्या लढाईत शेवटचा योग्य पर्याय ठरणार आहे. हे दुर्दैव आहे की काही लोक राजकीय कारणांमुळे लसीबद्दल चुकीची माहिती पसरवित आहेत. यामुळे लोकांच्या एका छोट्या गटाला या लसीबाबत संकोच वाटतो.’

दरम्यान, ‘डॉक्टरांप्रमाणेच प्रत्येकालाही समान संरक्षण असले पाहिजे. ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे.  सौम्य दुष्परिणाम सामान्य आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या लसीकरणानंतर दिसू शकतात,’ असे म्हणत लस घेण्यासाठी लोकांनी मागे पुढे पाहू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
धनंजय मुंडेंना दिलासा! रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे; दिले ‘हे’ स्पष्टीकरण
अभिजीत बिचकुलेंचे मुख्यमंत्र्यांना थेट मुंबईत जाऊन आव्हान; मुद्दे पाहून खुष व्हाल
सोनू सूदला उच्च न्यायालयाचा तगडा झटका; मुंबई महापालिकेविरोधातील याचिका फेटाळली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.