अरे वा! कोरोना लस घेतल्यानंतर केंद्र सरकार देतंय ५ हजार रुपये, जाणून घ्या प्रक्रिया

मुंबई | देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. यासाठी सरकारने लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. यामध्ये तुम्हाला घरबसल्या ५००० रुपये मिळवण्याची संधी आहे.

केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारने अधिकृत ट्विट करत याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे. या स्पर्धेत लस घेणारी प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते.

केंद्र सरकार जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस घ्यावी यासाठी प्रयत्न करत आहे. लोकांनी स्वत: पुढे येऊन कोरोना लस घ्यावी त्यासाठी लोकांची जनजागृती व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाला चालना मिळणार आहे.

या स्पर्धेसाठी काही नियम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला कोरोना लस घेताना फोटो काढावा लागणार आहे. त्यासोबत लसीकरणाचे महत्वं सांगणारी एक मस्त टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे इतर लोकांना प्रेरणा मिळेल. तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर लॉग इन करावं लागेल. तिथे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. तुमचा फोटो आणि टॅगलाईन पाठवा.

सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल. तो या स्पर्धेचा विजेता असणार आहे. सरकारकडून १० विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. त्याला बक्षीस म्हणून ५००० रुपये केंद्र सरकारच्या वतीने देण्यात येतील.

दरम्यान, कोरोना लसीकरण मोहिमेच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय याबाबातची आकडेवारी देत आहे. दररोज लाखो लोकांना कोरोना लसीचे डोस दिले जात आहेत. तसेच ठिकठिकाणी लसीचा तुटवडा असल्याच्या बातम्या येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे होऊ शकतो मधुमेह? आयसीएमआरच्या डॉक्टरांनी दिली ‘ही’ माहिती
कोरोनाने आधी खासदाराला हिरावले, अन् आता २ मुलांचा घेतला जीव; अख्ख कुटूंबच झालं उध्दवस्त
वयाची पन्नासी पार करुन देखील २० वर्षांच्या दिसतात ‘या’ अभिनेत्री; जाणून घ्या त्यांच्या फिटनेसचे सीक्रेट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.