भारतात तयार केलेली कोरोनावरील लस १५ ऑगस्टपर्यंत येणं शक्यच नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

 

मुंबई। कोरोनाच्या संकटामुळे चिंतेत असलेल्या देशवासीयांना गुरूवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) दिलासादायक बातमी दिली. भारत बायोटेक आणि आयसीएम यांनी कोरोनावर प्रभावी ठरू शकणारी कोव्हॅक्सीन ही लस शोधली आहे.

ही लस १५ ऑगस्टपर्यंत बाजारात आणणार असल्याचा विश्वास आयसीएमआरने व्यक्त केला आहे. मात्र, आयसीएमआरने केलेला दावा अवास्तविक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात ‘इंडियन एक्स्प्रेस’ने वृत्त दिले आहे. “अद्याप चाचण्या सुरू असलेली लस इतक्या लवकर तयार कशी होणार हेच समजत नाहीये. १५ ऑगस्टपर्यंत लस तयार होणार हे उद्दिष्ट पूर्णपणे अवास्तविक आहे.

कोणतीही लस इतक्या वेगात तयार केली जात नाही. त्यात बऱ्याच प्रक्रिया आहेत. आपण चांगल्या स्थितीत असतानाही संकटकालीन स्थितीत असल्याचं समजून १५ ऑगस्टपर्यंतच कालमर्यादा ठरवणे. हे अशक्य नसलं तरी अवास्तविक आहे,” असे रोगप्रतिकार तज्ज्ञ विनिता बाळ म्हणाल्या आहेत.

“जी लस तयार करण्यासाठी अजूनही प्री क्लिनिकल डेव्हलपमेंट चालू आहे, अशा स्थितीत आयसीएमआरच्या पत्रातील दाव्यानुसार ७ जुलैपासून क्लिनिकल चाचणी कशी सुरू केली जाऊ शकते? लस १५ ऑगस्टपर्यंत कशी उपलब्ध होऊ शकते?

व्हॅक्सिनची चाचणी एका महिन्यापेक्षा कमी वेळात पूर्ण झाली, म्हणजे त्या व्हॅक्सिनची कार्यक्षमता (किंवा किती गुणकारी आहे) ही आधीच ठरवली होती का?,” असे अनंत भान यांनी म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.