कोरोना लस किती कालावधीपर्यंत सुरक्षा देऊ शकते, वाचा संशोधक काय म्हणतात…

देशभरात कोरोनाच्या संकाटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने वेगवेगळे निर्बंध लावले आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात आता लसीकरणालाही सुरुवात झाली आहे.

ही कोरोना लस किती कालावधीपर्यंत माणसाला सुरक्षित ठेऊ शकते. यावर अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केले आहे. त्यामुळे सध्या संशोधक लसीकरणावरही संशोधन करताना दिसून येत आहे. मात्र अजून संशोधकही खरा दावा करण्याच्या स्थितीत नसल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर लस किती प्रभावी आहे. तसेच त्यासाठी किती अतिरिक्त डोसची गरज भासणार आहे, संशोधक याबाबत तपासणी करत आहे. त्यामुळे ते लस घेतलेल्या लोकांचे निरिक्षण करताना दिसून येत आहे.

अशात आतापर्यंत सुरु असलेल्या फायझर लशीच्या ट्रायलवरुन असे दिसत आहे की ही लस किमान सहा महिन्यांपर्यंत प्रभावी ठरु शकते. मात्र त्यापेक्षा अधिक काळ ही लस प्रभावी असेल असे काही दिसून येत नसल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.

तसेच मॉडर्ना कंपनीच्या लसीचा दुसरा डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी निश्चित सहा महिन्यांसाठी अँटीबॉडीज असतात. पण अँटीबॉडीजमुळे सर्वकाही स्पष्ट होत नाही.

बाह्य विषाणूंविरोधात लढण्यासाठी प्रतिकार यंत्रणेमध्ये बी आणि टी पेशी नावाच्या संरक्षणाची दुसरी भिंत देखील असते. अँटीबॉडीजचा स्तर कमी झाल्यानंतर यापैकी काही पेशी शिल्लक राहतात. जर भविष्यात पुन्हा संसर्ग झाला तर त्या पेशी त्यांचे कार्य वेगाने सुरु करतात. परंतू कोरोनाकाळात या पेशी ही भुमिका कशा निभावतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच मेरीलँड युनिव्हर्सिटितील संशोधक कॅथलिक नेयुजिल यांनी म्हटले आहे की, कोरोना लस किमान एक वर्ष प्रभावी ठरणे आवश्यक आहे. पण ती गोवरच्या लसीप्रमाणे आयुष्यभर प्रभावी ठरेल असे नाही.

महत्वाच्या बातम्या-

संचारबंदीतही थाटात सुरू होता विवाहसोहळा; कलेक्टरने नवरानवरीला अटक करून काढली  वरात
“हिम्मत असेल टीका करण्यापेक्षा, किरीट सोमय्या यांनी केंद्राकडून मदत मिळवून द्यावी”
गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो आणि फक्त पोरींचे फोन उचलतो – एकनाथ खडसे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.