कोरोनावरील लस कधी मिळणार? डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितली वेळ 

मुंबई | देशात कोरोना विषाणूचा हाहाकार सुरु आहे. परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. याचबरोबर वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.

अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील जनतेला करोनावरील लस पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे.

याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना पुढे ते म्हणाले, ‘पुढील वर्षाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत देशातील जनतेला लसीचा पुरवठा करण्यात आपण सक्षम असू. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये २५ ते ३० कोटी जनतेला लस पुरवण्याची योजना आम्ही आखली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सिरम इन्स्टिट्यूटने केला १०० कोटींचा मानहानीचा दावा…
हैदराबाद येथील एका रुग्णाने ‘कोविशील्ड’ लस घेतल्यामुळे आपल्या शरीरावर दुष्परिणाम झाल्याचा दावा केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यापोटी 5 कोटी रुपये नुकसान भरपाई त्याने मागितली आहे. मात्र सीरम संस्थेने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

याबाबत सीरमकडून सांगण्यात आले की, रुग्णाला आमची सहानुभूती आहे. कोव्हिशिल्ड लशीची चाचणी आणि त्याची सध्या बिघडलेली प्रकृती याचा काहीही संबंध नाही. विनाकारण तो सीरम संस्थेला दोषी धरत असून असे चुकीचे आणि गंभीर आरोप करणाऱ्या या व्यक्तीवर कंपनीकडून 100 कोटींचा मानहानीचा दावा करण्यात आला आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
आत्महत्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट; पहा काय आहे पोस्टमध्ये
एकनाथ खडसे इन ॲक्शन! मोठा गैरव्यवहार उघड करणार; तेही पुराव्यासहीत
ऑक्सफर्डची कोरोना लस किती प्रभावी? अखेर WHO ने सोडले मौन; म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.