मुंबई | सर्वत्र कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरूच आहे. कोरोनावरील लस कधी येणार आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कधी कमी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच भारतात डिसेंबर अखेरपर्यंत करोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे.
यासंदर्भातील माहिती गुलेरिया यांनी गुरुवारी दिली. सध्या भारतात ६ लसींवर काम सुरू आहे. ज्यामध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेका आणि भारत बायोटेक लसीच्या तिसरा टप्प्यातील चाचणी सुरु आहे. तिसरा टप्प्यातील चाचणी घेत असलेल्या लसींपैकी कोणत्याही एका लसीला मंजुरी मिळू शकते.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, लसीला ही मंजुरी डिसेंबर महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारीच्या सुरूवातीला दिली जाऊ शकते. या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही लसीची प्रक्रिया सुरू होईल, अशी सकारात्मक माहिती डॉक्टर गुलेरिया यांनी दिली आहे.
दरम्यान, लसीच्या पुरवठ्याबाबत सांगताना गुलेरिया म्हणतात, लस देण्यासाठी प्राधान्यक्रम यादीची गरज आहे. सर्वप्रथम आम्ही त्या लोकांचं लशीकरण करु ज्यांची कोरोनामुले मृत्यूची शक्यता आहे. वृद्ध, अन्य आजारांनी पीडित आणि सर्वात पुढच्या फळीत काम करणाऱ्या कामगारांना पहिल्यांद्या डोस देण्यात यायला हवा.’
महत्त्वाच्या बातम्या
‘मोदी म्हणतात सर्वांना लस मिळणार, सरकार म्हणतं म्हणालोच नाही; नक्की काय?’
डॉ. शीतल आमटे – करजगी यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं? घ्या जाणून
हेमा मालिनी- धर्मेंद्र पुन्हा झाले आजी-आजोबा; घरात एकाच वेळी डबल धमाका