“कोरोना लसची पहिली खेप स्वीकारण्यासाठी तयार राहा”

कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीमुळे जवळपास सर्वच देश चिंतेत आहेत. कोरोनाव्हायरसवर लस कधी तयार होईल याची प्रत्येकजण वाट पाहत आहे. जगभरात २०० हून अधिक संभाव्य लस तयार केल्या जात आहेत. ही लस तयार करण्याच्या शर्यतीत अस्त्राझेनेका आघाडीवर आहे. अस्त्राझेनेका नावाच्या ब्रिटीश औषध उत्पादक कंपनीकडून पुढच्या आठवड्यापासून ही लस वाटप करण्यात येणार आहे.

ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लसीचे नाव AZD1222 किंवा ChAdOx1 nCoV-19 असे आहे. ही लस ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांनी विकसित केल्यानंतर अस्त्राझेनेकाला या लसीचा एप्रिल महिन्यात परवाना दिला. तसेच लंडनमधील महत्त्वाच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या लशीची पहिली खेप स्वीकारण्यासाठी तयार रहा, असे सांगण्यात आले आहे.

ही लस कोरोना व्हायरसची साथ संपवण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येत्या दोन नोव्हेंबरपासून म्हणजेच पुढच्या आवठडयापासून कोरोना लसीसाठी तयार राहा, असे यूकेमधील महत्त्वाच्या रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. अस्त्राझेनेकाने नंतर जगातील वेगवेगळया कंपन्या आणि सरकारांबरोबर लसीचा पुरवठा आणि उत्पादनाचे करार केले. या लसीचे ‘कोविशिल्ड’ या नावाने भारतात सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन करत आहे.

ब्रिटन, भारत, ब्राझील, अमेरिका या देशातही ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या सुरु आहेत. मान्यता मिळाल्यानंतर जगातील बहुतांश देशांमध्ये ही लस उपलब्ध आहे. तसेच या कंपनीच्या सीईओ यांनी जुन महिण्यात म्हणटले होते की, या लसीपासून वर्षभर संरक्षण मिळू शकते. तसेच ही लस दिल्यानंतर वयोवृद्ध व्यक्तींमध्येही मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचा दावा रिपोर्टमधून करण्यात आला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.