महत्वाची बातमी! लशीचे दोन्ही डोस घेतले तरी ‘या’ लोकांना घ्यावा लागणार बुस्टर डोस

कोरोनाला रोखण्यासाठी देशपातळीवर लसीकरण मोहिम सुरु आहे. कोरोनापासून बचावकरण्यासाठी लसीकरण हा एकमात्र उपाय असल्याचे वारंवार म्हटले जात आहे, पण अजूनही लसीकरणानंतर काही लोकांमध्ये ऍन्टीबॉडीची पातळी कमी असल्याचे आढळून आली आहे.

लसीकरणामुळे मानवी शरीरात ऍन्टीबॉडी वाढते, पण काही लोकांमध्ये दोन्ही लसी घेऊनही पुरेशा ऍन्टीबॉडीज वाढल्या नाहीये. त्यामुळे आता ऍन्टीबॉडीची पातळी कमी असलेल्या बुस्टर डोसची आवश्यकता भासेल अशा रिसर्चच्या माध्यमातून समोर येत आहे.

कोरोना लसीकरणानंतरही २० टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधाच्या ऍन्टीबॉडी तयार झालेल्या नाही. भुवनेश्वरच्या रिसर्च युनिटच्या २३ टक्के स्वयंसेवकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले होते. पण त्यांच्या शरीरात ऍन्टीबॉडीची पातळी आधी सारखीच राहिल्याचे दिसून आले आहे.

आता भुवनेश्वर येथील इन्स्टिट्युट ऑफ लाइफ सायन्सचे संचालक डॉ. अजय परीदा यांनी शिफारस दिली आहे की कमी ऍन्टीबॉडी असणाऱ्या लोकांनी बुस्टर डोस दिला जाऊ शकतो.

भुवनेश्वर येथील इन्स्टिट्युट इंडियन SARS-CoV-2 जीनोम कंसोर्टीयमचा एक भाग आहे. देशभरातील २८ प्रयोगशाळांचं एक नेटवर्क आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, ज्या लोकांना लसीचे दोन्ही डोस दिलेत, त्यातील अनेक लोकांची ऍन्टीबॉडी पातळी चार ते सहा महिन्यानंतर कमी होता असल्याचे आढळत आहे. त्यामुळे ज्यांची निगेटिव्ह ऍन्टीबॉडी असेल त्यांना बुस्टर डोस घ्यावा लागणार आहे.

अजय परीदा म्हणाले की, क्लिनिकल चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे. भारतातील कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिनचा प्रभाव ७०-८० टक्के आहे. लसीकरण झालेल्या २०-३० टक्के लोकांमध्ये ऍन्टीबॉडी विकसित होऊ शकत नाही. सध्या जागतिक आरोग्य संघटनेने बुस्टर डोसवर स्थगिती दिली आहे. पण बुस्टर डोसची शिफारस लवकरच मंजूर केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

साताऱ्यात पुन्हा एकदा दोन्ही राजेंच्या समर्थकांत तुफान हाणामारी, अनेकजण गंभीर जखमी
अनिल कपूरची मुलगी रिया कपूर झाली ओप्स मुव्हमेंटची शिकार, कपड्यांमधून दिसला प्रायव्हेट पार्ट
साकीनाका रेप केस: निलम गोऱ्हे थेट वर्षावर दाखल; मुख्यमंत्र्यांना दिला ‘हा’ सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.