कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी खास ऑफर; देत आहेत, कार, सोने आणि आयफोन

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून , तिसऱ्या लाटेची येण्याची शक्यता लवकरच वर्तवली जात आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करणे खूप गरजेचे आहे. मात्र अनेकजण लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

देशात १८ वर्षाच्या पुढील नागरिकांच्या लसीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. लसीकरण करून घेण्यास नागरिकांना प्रोत्साहन म्हणून अनेक देशात अनेक आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. भारतात मोफत बिर्याणी, मोफत बिअर यासारख्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

हॉंगकॉंग मध्ये मात्र फारच आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरीकांना इलेक्ट्रिक कार, सोन्याची बिस्किटे आणि लडी, आयफोन, शॉपिंग व्हाऊचर जिंकण्याची संधी मिळणार मिळणार आहे.

चीनचे विशेष प्रशासनिक क्षेत्र असलेल्या या देशात अधिकारी आणि स्थानिक व्यापारी, उद्योजकांनी यासाठी हातमिळवणी केली आहे. ३१ ऑगस्ट पूर्वी लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्या नागरिकांना टेस्लाची ४८ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक कार, सोन्याच्या विटा, आयफोन्स, रोख रक्कम, पगारी रजा अशा अनेक ऑफर्स असून लॉटरी पद्धतीने त्या वस्तू जिंकता येणार आहेत.

ऑस्ट्रेलियन इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी फर्म गुडमनच्या स्थानिक कार्यालयाने देखील लॉटरी ड्रॉ काढून आयफोन सारखी बक्षिसे देण्याची तयारी केली आहे. हे ड्रॉ सप्टेंबरमध्ये काढले जाणार आहेत. देशातील सर्वात मोठी डेव्हलपर सन हुंग काई प्रॉपर्टी लिमिटेड आणि बिझिनेस टायकुन ली शाउकीच्या हेंडरसन लँड डेव्हलपर कंपनीने सोन्याच्या विटा, लडी अशी पारितोषिके ठेवली आहेत.

अशाप्रकारे सगळ्या देशात लसीकरणासाठी असे वेगवेगळ्या ऑफर ठवले तर नक्कीच सगळेजण लसीकरण करेल यात काही शंका नाही. भारतात देखील काही ठिकाणी वेगवेगळ्या ऑफर ठेवल्या जात आहेत.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! इलेक्ट्रिक दुचाकी होणार स्वस्त, मोदी सरकारने अनुदानाची रक्कम वाढवली

शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकासोबतच..; आजी आजोबांचा व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येईल

VIDEO: साडी घालून महिलेने केला जबरदस्त डान्स; आतापर्यंत ९० लाख लोकांनी बघितला व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.