…अन् मध्यरात्री नाईट ड्रेसमध्येच नागरिक आले कोरोना लस घ्यायला; कारण वाचून बसेल धक्का

मुंबई | जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. तर काही देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशातच अमेरिकेमधील सिअ‍ॅटल शहरामधील एका रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोरोना लसीचा साठा करुन ठेवलेला मोठ्या आकाराचा फ्रीज अचानक खराब झाला. फ्रीज अचानक गायब झाल्याने करोना लसी खराब होतील या भीतीने गुरुवारी रात्री ११ वाजल्यानंतर स्थानिक प्रशासनाने लोकांना तातडीने करोना लसीकरण केंद्रावर येऊन लस घ्यावी असे मेसेज पाठवले.

मेसेज पाठवण्यात आल्यानंतर काही वेळातच शहरातील नागरिक घरच्या कपड्यांमध्येच लस घेण्यासाठी केंद्राबाहेर जमा होऊ लागले. यामध्ये काहीजण पायजम्यात होते तर काही नाईट ट्रेसमध्ये रांगेत उभे असल्याचे दिसून आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मॉडर्नाच्या लसीचे १६०० डोस खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच मध्य रात्रीपासून सकाळपर्यंत स्थानिकांना लस देण्याचे काम अवितरतपणे सुरु होते.

दरम्यान, अमेरिकेत करोना विषाणूचा हाहाकार सुरूच आहे. तसेच अमेरिकेत सध्या फाइजर आणि मॉडर्ना कंपनीच्या लसी दिल्या जात आहे. या लसींचे डोस सुरक्षित ठेवण्यासाठी खूपच कमी तापमानामध्ये त्या ठेवणं गरजेचं असते. त्यामुळेच फ्रीज खराब झाल्याने नियोजित वेळेआधीच या लसी सर्वांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या
पतंजली देणार पाच लाख तरुणांना रोजगार; बाबा रामदेव यांची घोषणा
‘मोदी सरकार म्हणजे खिशात नाही आणा अन् बाजीराव म्हणा…’
…म्हणून विरुष्काच्या लेकीचं नाव आहे खास; जाणून घ्या या नावामागचा अर्थ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.