चांगले उपचार मिळाले असते तर वाचलो असतो म्हणत अभिनेत्याने सोडले प्राण; शेवटची पोस्ट वाचून डोळ्यात पाणी येईल

कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे हॉस्पिटल मधील बेड्स पण अपुरे पडायला लागले आहेत. अभिनेता आणि थिएटर आर्टिस्ट राहुल वोहराचे पण कोरोनामुळे निधन झाले आहे.

राहुलच्या निधनाची माहिती त्याचे गुरु आणि दिग्दर्शक अरविंद गौड यांनी सोशल मीडियातून दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून राहुल सोशल माध्यमातून मदत मागत होता.

शनिवार दिनांक ८ मेला त्याने सोशल मीडियात मदतीसंदर्भात पोस्ट टाकली होती. राहुल वोहरा उत्तराखंड येथे राहत होता. त्याने थिएटरनंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती.

राहुलने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, “‘मलाही चांगली ट्रीटमेंट मिळाली असती तर मी सुद्धा वाचू शकलो असतो. तुमचा राहुल वोहरा.” राहुल पुढे म्हणतो की, “लवकरच मी पुन्हा जन्म घेईन आणि चांगलं काम करेन. पण आता माझ्यात हिंमत राहिलेली नाही.”

राहुलच्या निधनाला त्याचे गुरु अरविंद गौडा यांनी दुजोरा दिला आहे. ते म्हणतात की, “राहुल वोहराचं निधन झालं. माझा उत्कृष्ट अभिनेता आता राहिला नाही. कालच तो म्हणाला होता की त्याला चांगले उपचार मिळाला असता तर तो वाचला असता.

त्याला काल राजीव गांधी हॉस्पिटलमधून आयुष्मान द्वारकामध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. पण राहुल आम्ही सर्व तुला वाचवू शकलो नाही, माफ कर, आम्ही तुझे अपराधी आहोत.” मागच्या आठवड्यात पण राहुलने अनेक सोशल मीडिया पोस्टमध्ये मदत मागितली होती.

ताज्या बातम्या
नागपूरच्या दीक्षाभूमीत उभे केले ३० बेड्सचे कोविड सेंटर; गरीब रुग्णांना मिळणार मोफत उपचार
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री का करत नाही मेकअप? कारण जाणून घ्या 

करीना कपूरने विश्वसुंदरी ऐश्वर्या रायला म्हातारी म्हणून हिणवले; वाचा पूर्ण किस्सा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.