एकेकाळी सर्वाधिक मानधन, आता कोरोनामुळे नाहीत घरखर्चासाठी पैसे, वाचा कोणावर आलीय ही वेळ..

मुंबई । कोरोना संकटामुळे देशात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. सर्वांनाच मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. त्यातच अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर काहींना काम नसल्यामुळे घरीच बसावे लागत आहे. यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे.

टीव्ही मालिकेत काम करणाऱ्या अनेकांना याचा फटका बसल्याचे समोर आले आहे. एकेकाळी सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळख असणाऱ्या चेतन हंसराज या नामांकित टीव्ही अभिनेत्यावर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आली आहे. त्याने स्वतः ही माहिती दिली आहे.

सध्या कोरोनामुळे शूटिंग बंद असल्याने हंसराज हा देखील बेरोजगार झाला आहे. न्यूज ट्रॅकला दिलेल्या एका मुलाखतीत हंसराजने आपल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत म्हटले की, इतर कलाकारांप्रमाणेच मी घरात बसलो आहे. यामुळे तो मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

तो म्हणाला, की, यापूर्वी केलेल्या कामाचा मोबदला देखील अद्याप मिळालेला नाही, त्यामुळेच माझ्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा बोजा वाढत आहे. चेतन हंसराजने काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात टीव्ही मालिकेत काम केले होते. त्यावेळी तो सर्वाधिक मानधन घेत होता. मात्र आता अत्यंत वाईट परिस्थिती आहे.

आज त्याचा वाढदिवस असून मित्रांना पार्टी देण्यासाठी देखील चेतन हंसराज याच्याकडे पैसे शिल्लक नाहीत, असेही तो म्हणाला. लवकरच ही परिस्थिती जाऊन जुने दिवस परत येतील, अशी आशा चेतन हंसराजने व्यक्त केली आहे. यामुळे या काळात मोठ्या अभिनेत्यांवर अशी वेळ येत असेल तर सर्वसामान्य लोकांवर तर काय वेळ येत असेल.

कोरोनामुळे सगळे जग काहीसे थांबले आहे. अर्थव्यवस्था देखील संकटात सापडली आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रातच याचा मोठा फटका जाणवत आहे. आता काही प्रमाणात परिस्थिती सुधारत आहे. मात्र याला अनेक वर्ष जाणार आहेत.

ताज्या बातम्या

विद्यार्थीनीचे शिक्षकाशी होते प्रेमसंबंध, मंदीरात जाऊन गुपचुक केलं लग्न आणि…

पहिल्या पत्नीचे ‘ते’ पत्र वाचून अमीर खान खूप रडला, जाणून घ्या काय घडले

याला म्हणतात मद्यप्रेमी! दारुची दुकान उघडल्याने बाटलीची दिवा लावून केली पुजा आणि नंतर…; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.