..त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक, तज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या दिवसाला साडे तीन लाखांच्यावर कोरोना रुग्ण सापडत आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेमुळेच पुर्ण देश चिंताग्रस्त असताना आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

कोरोनाची ही तिसरी लाट ही लहान मुलांसाठी अधिक घातक ठरु शकते, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच ही कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

कोरोनाची पहिली लाट ही वृद्धांसाठी घातक ठरत होती. दुसरी लाट ही तरुण पिढीसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे येणारी कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, लहान मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात केली पाहिजे. सरकारने या संदर्भात कुठलीही त्वरीत पावले उचलली नाही. तर कोरोनाची तिसरी लाट प्राणघातक ठरु शकते, असे बालरोग तज्ञ आणि संसर्गजन्य रोग तज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची भिती वर्तवली जात आहे. अशात लहान मुलांना लस न दिल्यास धोका आणखी वाढू शकतो. यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस सर्वात मोठा शस्त्र लसच आहे, असे संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. नितिन शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोना संसर्गामुळे भलेही सध्या मुलांमध्ये कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही. तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. मुंबई पुणेसारख्या शहरांमध्ये लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जर तिसरी लाट आली, तर घातक ठरु शकेल, असेही काही तज्ञांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुंबई पालिकेचे कौतुक करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला झाप झाप झापले, म्हणाले..
VIDEO: पोलिसांसमोर तरुणीचा भररस्त्यात ड्रामा; मुख्यमंत्र्यांसोबत मोदींनाही सुनावले खडे बोल
VIDEO: धक्कादायक! केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; काचा फोडल्या अन्…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.