धक्कादायक! कुंभमेळ्यातील १ लाख कोरोना चाचण्या बनावट, कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती

देशात कोरोनाचे थैमान अजूनही सुरूच आहे. या काळात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. देशात कोरोनाची परिस्थिती असताना मागील काही दिवसांत कुंभमेळ्याचे आय़ोजन करण्यात आले होते, मात्र यावर देशभरातून टिका करण्यात आली होती.

आता कुंभमेळ्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत अशी माहिती उत्तराखंड प्रशासनाकडून देण्यात येत होती. मात्र केलेल्या चाचण्यांपैकी ४ लाख कोरोना अहवाल बनावट असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना अहवाल गोळा करण्याचे काम उत्तराखंड आरोग्य विभागाने काही खासगी एजन्सीला दिले होते. अहवाल गोळा करण्यासाठी २०० विद्यार्थी राजस्थानमधील डेटा ऑपरेटर असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील कोणीही अहवाल घेण्यासाठी हरिद्वारमध्ये आले नव्हते. यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

मागील महिन्यात कोरोनाची परिस्थिती असताना हरिद्वारमध्ये १ ते ३० एप्रिल काळात कुंभमेळा पार पडला होता. यावेळी नऊ एजन्सी आणि २२ खासगी प्रयोगशाळांनी मिळून एकूण चार लाख चाचण्या करण्यात आल्या होत्या.

यामुळे आता प्रशासनावर टीका करण्यात येत आहे. कुंभमेळ्यामुळे कोरोना वाढला असे देखील अनेकदा सांगितले जात होते. या प्रकरणामुळे आता अजूनच टीका करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

‘जाळ अन धूर संगटच!’ रिंकू राजगुरुच्या स्टायलिश अंदाजावर नेटकरी तुफान फिदा

सावूथ आणि हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या ‘ह्या’ अभिनेत्रीचा आहे राजेशाही थाट; करते दुधाने आंघोळ आणि घालते चांदीची चप्पल

या मुस्लिम देशात आहे भगवान विष्णुची सर्वात उंची मुर्ती; कारण वाचून तुम्हाला पण वाटेल आश्चर्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.