कोरोना विरुद्ध लढ्यात टाटा मैदानात! कोरोना टेस्ट किट लाँच; अवघ्या काही मिनिटांत रिझल्ट

मुंबई| कोरोनाची तपासणी करणारे अनेक किट उपलब्ध असताना आता टाटा समूहाने नवीन कोरोना टेस्टिंग किट तयार केले आहे. हे किट सर्वसामान्यांना दिलासा देणारे ठरेल. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो कोटी रुपयांची मदत करणाऱ्या टाटा ग्रुपने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे.

टाटा ग्रुपच्या हेल्थकेयर यूनिट टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक्सने आता कोविड-19 टेस्ट किट तयार केले आहे. कंपनीकडून सोमवारी हे किट लाँच करण्यात आले आहे. टाटाने तयार केलेले हे कोविड-19 टेस्ट किट्स डिसेंबर महिन्यात देशभरातील लॅबमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.

सीईओ गिरिश कृष्णमूर्ति यांनी न्यूज एजेन्सी रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. टाटाच्या टेस्ट किटचे नाव ‘TataMD CHECK’ असे ठेवण्यात आले असून CSIR-IGIB सोबत मिळून हे टेस्ट किट बनविण्यात आले आहे. यामुळे परदेशी टेस्ट किटवरील खर्चही वाचणार असून मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यास मदत मिळणार आहे.

या टेस्ट किटला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. हे टेस्ट किट तपासणीच्या ९० मिनिटांमध्ये रिझल्ट देईल, असे सांगण्यात आले आहे. या कोविड-19 टेस्ट किट्सला चेन्नई येथील टाटा प्लांटमध्ये तयार करण्यात येणार आहे. या प्लांटमध्ये दर महिन्याला १० लाख टेस्ट किट्स तयार करण्याची क्षमता असल्याचे कृष्णमूर्ति यांनी सांगितले.

याचबरोबर, या किटसाठी स्टँडर्ड लॅबोरेटरी यंत्रणा लागणार असून लॅबोरेटरीमध्ये चाचणी केल्यास ४५ ते ५० मिनिटांत पहिला रिझल्ट मिळू शकणार आहे. तर आरएनए एक्सट्रॅक्ट सॅम्पलचा एकूण रिझल्ट मिळण्यास ७५ मिनिटे लागणार आहेत. यामुळे हे किट सर्वसामान्यांना दिलासा देणारे ठरेल.

 

महत्त्वाच्या बातम्या

आता आले टाटाचे कोरोना टेस्ट किट; चिनी टेस्ट किटपेक्षा आहे भारी; खर्चही कमी
अर्णब, तुला भारतात भीती वाटत असेल तर पाकिस्तानमध्ये जा; बड्या अभिनेत्यानेच्या ट्विटने खळबळ
७० आणि ८० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा राजू आज असे आयुष्य जगतो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.