कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?; आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी सांगितली तारीख

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाने झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ही लाट कधीपर्यंत ओसरेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

अशात नक्की ही लाट ओसरेल की आणखी वाढेल, असाही प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. असे असताना भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) च्या शास्त्रनांनी याबाबत संशोधन केले आहे.

शास्त्रज्ञांनी त्यांच्या मॉडेलदच्या आधारे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबद्दल अंदाज बांधला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या साथीची लाट ११ ते १५ मे दरम्यान शिगेला पोहचणार आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

त्यावेळी देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३३ ते ३५ लाखांच्या दर्यान पोहचू शकते. त्यानंतर मेच्या अखेरीस ही लाट ओसरेल असे शास्त्रज्ञांनी मॉडेलद्वारे म्हटले आहे. आयआयटी कानपुर आणि हैद्राबादच्या शास्त्रज्ञांनी मॉडेलच्या आधारे हे स्पष्ट केले आहे.

तसेच हरीयाणा, दिल्ली, राजस्थान आणि तेलंगणामध्ये रोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहे. २५ ते ३० एप्रिल दरम्यान रुग्णांची संख्या उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये रुग्णवाढ आताही सुरुच आहे.

आम्हाला आढळले की, ११ ते १५ मे दरम्यान उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढण्याचे तार्किक कारण आहे. ही संख्या ३३ ते ३५ लाखांपर्यंत ही संख्या वाढू शकते. ही वाढ वेगाने असले तरी मेच्या अखेरीस लाट ओसरण्याची शक्याताही वाढणार आहे, असे आयआयटी कानपुर संगणक विज्ञान विभागातील प्राध्यापक मनिंदर अग्रवाल यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी
ऐन कोरोनाच्या संकटात मुकेश अंबानीची ब्रिटनमध्ये फुल्ल टू शॉपिंग; ५९२ कोटींचा रिसॉर्ट केला खरेदी
गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.