बापरे! कोरोनाचा नियम मोडणाऱ्या तरुणीला पोलिसाने फक्त किस करुन सोडले, पहा व्हायरल व्हिडीओ

मुंबई | सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. परंतु यावेळी व्हायरल व्हिडीओत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या व्हिडीओत कोरोनाचा नियम मोडणाऱ्या तरुणीला उपस्थित पोलिसाने किस करून सोडले आहे.

कोरोना महामारीच्या काळात अनेक नवीन नियम बनवले गेले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी बनवलेले हे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. नियम मोडणाऱ्यांना शिक्षा केली जात आहे. याबाबतचे महत्त्वाचे काम पोलिस प्रशासन करताना दिसत आहे. अशातच एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये नियम मोडणाऱ्या तरुणीकडून दंड किंवा शिक्षेऐवजी उपस्थित पोलिसाने तिला चक्क किस करून सोडून दिले आहे.

या घटनेचा व्हिडीओ रस्त्यावरच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर हा व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये पोलिस कर्मचारी आणि तरुणी जवळ-जवळ उभे राहीले असल्याचे दिसते. तसेच पोलिस अधिकारी काही लिहीताना पाहायला मिळतो आहे. मात्र काही क्षणात पोलिस अधिकारी त्या तरुणीला किस करतो.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ पेरूची राजधानी लीमाच्या पोलिस अधिकाऱ्याचा आहे. या घटनेनंतर या पोलिस अधिकाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शेट्टीचे पितळ पडले उघडे! ‘असे’ शूट होतात चित्रपटातील कार स्टंट, पहा व्हिडीओ
प्रेग्नेंसीनंतर सपना चौधरीने धरला ताल; सोशल मिडीयावर व्हिडीओ घालतोय धुमाकूळ
स्वत:ची फसवणूक टाळा! ‘या’ कंपनीकडून वाहन इन्शुरन्स घेऊ नका, IRDAI चा इशारा
रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा का? वाचा सविस्तर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.