‘अरे बाबा काहीतरी नियम पाळा’, कोरोनाच्या भितीने अजित पवारांनी पुष्पगुच्छ नाकारला

महाराष्ट्राचे अजित पवार त्यांच्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांचे निर्णय घेण्याची आणि बोलण्याची पद्धत पण दरवेळी रोखठोकच असते. असाच एक प्रकार शुक्रवार दिनांक २१ मेला पुण्यात घडला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक बोलवण्यात आली होती. बैठक सुरु होण्याच्या आधी अजित दादा पवार यांना त्यांच्या हितचिंतकाकडून पुष्पगुच्छ पाठविण्यात आला. पण त्यांनी तो त्यांच्या स्टाईलमध्ये नाकारला आहे.

अजित पवारांच्या अध्यक्षतेत बैठक चालू होणार होती. पण तत्पूर्वी बैठक सुरु होण्याच्या आधी विधान भवन परिसरामध्ये ऑक्सिजन सिलिंडर, कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी वाहनांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी विधानभवन परिसरात अजित पवारांना भेटायला कार्यकर्त्यांनी पण गर्दी केली होती. याच गर्दीत एकाने दादा, तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचा आहे असे म्हणत हातातील पुष्पगुच्छ पुढे केला. पण यावेळी अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये पुष्प गुच्छ नाकारला.

अजित पवारांनी यावेळी पुष्पगुच्छ देणाऱ्या कार्यकर्त्याला “काय करतो आता. अरे, बाबा काहीतरी नियम पाळा. कोणाकडून हा गुच्छ आणला? त्याला कोरोना होता की नाही माहित नाही. काय माहित नाही, काय नाही. जरा काळजी घ्या.”

असं म्हणत अजित पवारांनी फोटोपुरते पुष्पगुच्छाला हात लावला आणि तिथून काढता पाय घेतला. अजित पवार त्यांच्या रोख ठोक स्वभावासाठी ओळखले जातात याची प्रचिती यावेळी पण सर्वाना आली. अजित पवारांनी मार्चमध्ये लस घेतली का या प्रश्नावर पण मजेशीर उत्तर दिले होते.

ताज्या बातम्या
पांरपारिक शेतीला फाटा देत केली श्रीलंकेच्या कोलंबस नारळाची शेती, कमावतोय १० लाख

कोरोनाने आपल्या जवळची माणसे गमावली; डॉक्टरांसोबत संवाद साधताना मोदींना आले रडू

महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले; पैलवानाचा विजेच्या धक्क्याने दुःखद मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.