अरे बापरे! घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी जमली हजारोंची गर्दी, कोरोना नियम पायदळी; पाहा व्हिडिओ

कर्नाटक | कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशातील अनेक राज्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार, विवाहसोहळे गर्दी न करता पार पाडण्याचा नियम करण्यात आला आहे. राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी कडक पावलं उचलत आहे.

असं असतानाच कर्नाटक मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकमधील कोन्नूर गावात मरठीमठ येथे एका घोड्याचा मृत्यू झाला होता. या घोड्याला निरोप देण्यासाठी गावात हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले होते.

मृत्यू पावलेला घोडा साधा सुधा घोडा नव्हता. स्थानिक देवतेला हा घोडा समर्पित केला होता. या घोड्यावर लोकांचं प्रेम होतं. शुक्रवारी रात्री घोड्याचा मृत्यू झाला. लोकांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी मोठ्या संख्येने मरठीमठाकडे गर्दी केली.

घोड्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक कदसिद्देश्वर आश्रमात पोहोचले. यावेळी अनेकांनी मास्क लावलेला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पायदळी तुडवला होता. सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

कोन्नूरचे तहसीलदार प्रकाश होलेपगोळ यांनी मरठीमठ परिसर १४ दिवसांसाठी सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गावातील लोकांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी या प्रकरणानंतर आपली प्रतिक्रीया दिली आहे. प्रशासनाला घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यामध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर  कडक कारवाई करण्यात येणार आहे. असं गृहमंत्री बोम्मई म्हणाले आहेत.

दरम्यान व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रशासनावरही सडकून टीका केली आहे.  कर्नाटकमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने राज्य सरकारने १ जुनपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
सुशील कुमारला फासावर लटकवा, त्याचे सर्व मेडल काढून घ्या; सागर राणाच्या कुटुंबाचा आक्रोश
पैलवान सुशिल कुमारने ‘अशी’ केली सागर धनखडची हत्या; धक्कादायक कारणही आले समोर
आनंद महिंद्रांनी शेअर केला एका आगाऊ बाळाचा व्हिडिओ; म्हणाले, हे बाळ…
‘निलंबनासाठी वडील जबाबदार’, पृथ्वी शॉचा खळबळजनक खुलासा

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.