पुणे | वर्षभरापासून देशभरात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने हळूहळू परिस्थिती पुर्वपदावर येत असतानाच पुन्हा कोरोनाने डोकं वर काढले आहे. यामुळे राज्य सरकारने पुन्हा कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वर्गमित्रांना ACB ने लाच घेताना केली अटक, एक होता उपजिल्हाधिकारी दुसरा गटविकास अधिकारी
उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बापरे! कोरोनाचा नियम मोडणाऱ्या तरुणीला पोलिसाने फक्त किस करुन सोडले, पहा व्हायरल व्हिडीओ
यामध्ये सोमवारपासून पुण्यातील शाळा, कॉलेज, क्लासेस २८ फेबूवारीपर्यंत बंद राहणार आहेत. विवाह सोहळा २०० लोकांच्या उपस्थितीत पोलिसांची परवानगी घेऊन पार पाडणे आवश्यक आहे. हॉटेल, लॉज, बार, रेस्टॉरंट रात्री ११ वाजेपर्यंतरच सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
पुन्हा लॉकडाऊन? नवे नियम लागू, वाचा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार
सरकारी, राजकीय, खाजगी कार्यक्रमाला २०० लोकांचीच परवानगी असणार आहे. तसेच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच बांधली लगीनगाठ, पाच दिवसांनी पुन्हा जावं लागणार तुरूंगात