लोकांना ‘या’ कारणासाठी हवाय कोरोनाचा बोगस रिपोर्ट, वाचून तुम्हाला बसेल धक्का

अमरावती | कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. प्रत्येक व्यक्ती कोरोनापासून वाचण्यासाठी स्वत:ची काळजी घेत आहेत. अशात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. कोरोनाचे बोगस रिपोर्ट दाखवून विमा कंपन्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचे समोर आले आहे.

विमा कंपन्यांची फसवणूक करण्यासाठी लोकांनी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनवण्याचा धडाका लावला आहे. लोक कोरोनाचा बोगस रिपोर्ट तयार करुन त्याचा गैरफायदा घेत आहेत. असे कोरोना रिपोर्ट बनवणाऱ्या रॅकेटचा माध्यमांनी पर्दाफाश केला आहे. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

कोरोनाचा बोगस रिपोर्ट दाखवून विम्याचे लाखो रुपये उकळले जात आहेत. विमा कंपन्यांना गंडा घालण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे. मीडियावर याबाबतच्या ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहेत.

कोरोना रिपोर्टचा असा वापर
बोगस पॉझिटीव्ह रिपोर्ट दाखवून कर्मचारी कामावरुन सुट्टी घेत आहेत. काही लोक बोगस रिपोर्टवर विमान प्रवास करत आहेत. बोगस रिपोर्ट दाखवून मेडिकल इन्शुरन्स उकळला जातोय. तसेच हे बोगस रिपोर्ट दाखवून पोलीस चौकशी सुद्धा टाळली जात आहे.

कोरोनासाररख्या जागतिक संकटात अशाप्रकारे स्वत:ची घर भरण्यासाठी लोकांकडून बोगस रिपोर्ट बनवण्याची मागणी वाढली आहे. महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रशासनासाठी ही चिंतेची बाब आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं थैमान! लहान मुलांमध्ये वाढतंय कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण
चांगली बातमी! १ मार्चपासून सर्वसामान्यांना मिळणार कोरोनावरील लस, ‘या’ व्यक्तींना असेल प्राधान्य
कोरोनाचा पुन्हा हाहाकार! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुढील एका आठवड्यासाठी कडक लॉकडाऊन जाहीर
जंगी मिरवणूक काढणाऱ्या गजा मारणेने पोलिसांच्या नाकावर टिच्चून जामीन मिळवला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.