‘कोरोना रुग्णाला १८ हॉस्पिटलने दाखल करण्यास नाकारले; अखेर रुग्णाचा मृत्यू’

 

बंगळुरू | मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. तेव्हापासून कोरोनाग्रस्तांना आणि संशयित रूग्णांना अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये घेण्यास हॉस्पिटलने नकार दिल्याच्या घटना घडत आहे.

अशीच एक घटना देशाची आयटी राजधानी समजल्या जाणाऱ्या बंगळुरू शहरात घडली आहे.

दिनेश सुजानी यांचे ५२ वर्षीय बंधू भंवरलाल सुजानी यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांना कोरोना लागण झाल्याचा रिपोर्ट त्यांच्या मृत्यू नंतर आला आहे.

भंवरलाल यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच त्यांचे नाडीचे ठोके मंदावत होते, यामुळे दिनेश यांनी आपल्या भावास हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास निघाले.

शहरात नाईट कर्फ्यु असल्याकारणाने त्यांना कुठलीही टॅक्सी किंवा रिक्षा मिळाली नाही, यामुळे दिनेश यांनी आपल्या भावाला त्यांच्या स्कुटरवरच हॉस्पिटलमध्ये नेले.

यावेळी दिनेश यांनी त्यांच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांनी भंवरलाल यांना आता नेले व एक्सरे वगैरे काढला. यानंतर डॉक्टरांनी दिनेश यांच्या हातात कागद दिला.

यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले, यावेळी दिनेश त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता त्या ठिकाणी भंवरलाल यांना भरती करून घेण्यास नकार दिला.

असे १८ हॉस्पिटलमध्ये दिनेश यांनी त्यांच्या भावाला घेऊन गेले मात्र सगळीकडे त्यांना भरती करून घेण्यास नकार दिला गेला, अखेर भंवरलाल यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, दिनेश यांनी याबाबत पोलिसात कुठलीही तक्रार करणार नाही, असे म्हटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.