जिंकणार कोरोनासोबतचे युद्ध; ६० टक्क्यांहूनही अधिक झाला कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट

 

नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे परंतु सोबतच कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे.केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ६० टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी हा दर ६०.७३ टक्के इतका होता. देशामध्ये गेल्या चोवीस तासात २०,९०३ नवीन रुग्ण समोर आले असून त्यापैकी ३७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आता देशात कोरोना पॉझिटिव रुग्णांची एकूण संख्या ६ लाख २५ हजार ५४४ इतकी झाली आहे. सध्या देशात कोरोनाचे २ लाख २७ हजार ४३९ सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोनापासून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या लक्षणीय असून ती ३ लाख ७९ हजार ८९२ इतकी आहे. तर आजपर्यंत देशामध्ये १८ हजार २१३ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.