देशात गेल्या चोवीस तासात १६८३३ रुग्ण झाले कोरोनामुक्त; रिकवरी रेट पोहोचला ६१.५३ टक्क्यांवर

 

नवी दिल्ली | देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ४२ हजार इतकी झाली असून २० हजारांपेक्षाही जास्त मृत्यू झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या आकड्यांनुसार देशात आज २२,७५२ नवीन रुग्ण समोर आले आहेत.

गेल्या २४ तासात रुग्ण जरी मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी १६,८८३ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत देशात ४ लाख ५६ हजारांपेक्षाही जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात सद्यस्थितीला २ लाख ६४ हजार ९४४ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा दर प्रत्येक दिवशी वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आज हा दर ६१.५३ टक्के इतका होता. कोरोनामुळे सर्वात प्रभावित असणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५१३४ नवीन कोरोना रुग्ण समोर आले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.