धक्कादायक! पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या महिलेला उपचाराभवी झोपावे लागले फूटपाथवर

 

राज्यात कोरोनाच्या संकटाने पुन्हा थैमान घातले आहे. दिवसेंदिवस हजारोंच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण मिळत आहे. अशात अनेकांना उपचार मिळत नसल्याच्या धक्कादायक घटना घडत आहे, आता अशीच एक घटना पुण्यात घडली आहे.

पुण्यात कोरोना पण कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे अनेक रुग्णालयात तर बेड सुद्धा उपलब्ध नाहीये. अशात एका महिलेला कोरोनाच्या उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्यामुळे त्या महिलेला फूटपाथवर झोपण्याची वेळ आली आहे.

फूटपाथवर झोपलेली ही महिला पुण्याची रहिवासी आहे. या महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तिने कोरोनाचा उपचार घेण्यासाठी महानगरपालिकेचे जम्बो हॉस्पिटल गाठले होते.

तिथे पोचल्यावर त्या महिलेला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे तिची प्रकृती आणखी खराब झाली होती, असे असतानाही तिला व्हिलचेअर नाही म्हणून उपचारासाठी प्रतिक्षेत ठेवण्यात आले.

परिस्थिती बिघडू लागल्यामुळे ती महिल फूटपाथवरच झोपली. परंतु काही वेळाने त्या महिलेला जम्बो रुग्णालयाने व्हिलचेअर उपलब्ध करून देत उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे आणि तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.