सावधान! विमा कंपन्यांनी केल्या कोविड पॉलिसी बंद; क्लेम वाढत असल्यामुळे घेतला निर्णय

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे. अशातच विमाधारकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

विमा कंपन्यांनी आता कोविड पॉलिसी बंद केल्या आहे. कोरोनामुळे मृत्यु होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत चालेले आहे. त्यामुळे क्लेमदेखील वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत कंपनीला मिळालेल्या रकमेच्या एकूण १५० टक्के रक्कम क्लेम केल्यावर द्यावे लागतात.

त्यामुळे आता नवीन पॉलिसी घेणारे आणि जुनी पॉलिसी रिन्यु करणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कंपन्यांनी आता सर्वसाधारण प्रिमियममध्ये ही वाढ केली आहे. त्यामुळे आता विम्याच्या भरोशावर असणाऱ्या लोकांसाठी हे मोठे संकट निर्माण झाले आहे.

कोरोना आल्यानंतर अनेक कंपन्यांनी विविध कोविड हेल्थ पॉलिसी आणल्या होत्या. पण आता कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कंपन्यांना होणारा नफा कमी होत चालल्याने विमा कंपन्यांनी कोविड पॉलिसी बंद केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या देशभरात झपाट्याने वाढत आहे. रोज ४ लाख रुग्णांची भर पडत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक रुग्णांना उपचार भेटत नाहीये. त्यामुळेही अनेक रुग्णांचा मृत्यु होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनेच संपुर्ण देश चिंताग्रस्त असताना, आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही लाट अधिक घातक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

परेदशातून ७ लाख रुपये देऊन कॉलगर्ल बोलावणे पडले महागात; घडली धक्कादायक घटना
गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होतो? केंद्र सरकारने दिली वेगळीच माहिती..
दिग्दर्शकाने Action म्हणताच अभिनेते प्राणने किशोर कुमारच्या कानाखली वाजवली आणि…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.