कोरोनाने आपल्या जवळची माणसे गमावली; डॉक्टरांसोबत संवाद साधताना मोदींना आले रडू

कोरोनाच्या संकट काळात अनेक जणांनी जवळची माणसे गमावली. जवळची माणसे गमावल्याचे अनेक जणांना फार मोठे दुःख या काळात झाले. डॉक्टरांनी सेवा करताना पण घरातील जवळची माणसे गमावली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदार संघातील लोकांशी संवाद साधला. यात डॉक्टरांचा पण समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे साधलेल्या संवादात मोदींना पण भावना अनावर झाल्याने रडू कोसळले.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने मोदी पण भावुक झालेले पाहायला मिळाले. मोदींचे हे भावुक झालेलं रूप डॉक्टरांसाठी पण नवीनच होते. कोरोनामुळे आपण सर्वानीच जवळची लोक गेली असे म्हणताना मोदींनाच भरून आले होते.

नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, विशेष करून डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी मिळून जे काम केले ते अतुलनीयच आहे. या व्हायरसमुळे आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती मी सहानुभूती व्यक्त करतो.

असे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनी पुढे म्हटले आहे की, कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे. आपल्याला सर्वाना एक होऊन या लाटेचा सामना करावा लागणार आहे. आरोग्य यंत्रणेवर पण ताण येत असल्याचे यावेळी मोदी यांनी म्हटले आहे.

वाराणसीच्या डॉक्टरांना उद्देशून बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, आपण कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो. पण आपल्याला आता वाराणसी आणि पूर्वांचलमधील गावांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. प्रत्येकाने लस टोचण्याचे पण त्यांनी यावेळीच आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र केसरीचे स्वप्न भंगले; पैलवानाचा विजेच्या धक्क्याने दुःखद मृत्यू

माहीच्या पहिल्या गर्लफ्रेंडचे फोटो पाहिलेत का.? अपघातात झाला होता मृत्यू

“यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा.. याद रखना शिवसेना”- नितेश राणे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.