आता कोरोना रुग्णांना नातेवाईकांना भेटता येणार; आरोग्यमंत्र्यांचे नवे आदेश

मुंबई | कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधा, रुग्णांवर होणारे उपचार, याची पाहाणी करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नेमण्यात आली आहे.

ही समिती कोरोना रुग्णालयांना नियमित भेटी देईल. यासंदर्भात आरोग्य विभागाने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये सीसीटिव्ही बसवावा.

तसेच उपचार घेत असलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बोलता येईल यासाठी रुग्णालयात स्वतंत्र सोय करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला रुग्णालयाच्या आवारात प्रवेश द्यावा, व नातेवाईकांना थांबता येईल अशी जागा  रुग्णालयात तयार करावी.

कोरोना रुग्णालयांनी मदत कक्ष तयार करावा, जेथे रुग्णांचे नातेवाईक प्रत्यक्ष येऊन किंवा दूरध्वनीद्वारे उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करू शकतील. असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

त्याचबरोबर ज्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत, अशा ठिकाणी जिल्हा प्रशासनाने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत.

आरोग्यमंत्र्यांनी दिलेले आदेश
– रुग्णालयांना अचानक भेटी देण्याचे समितीला निर्देश आहेत.
– समिती सदस्य विलगीकरण कक्ष, आयसीयू यांना भेटी देतील.
– तसेच रुग्णाला देत असलेल्या उपचाराची माहिती घेऊन कागदपत्रांची पाहणी करतील.
– या समितीने नियमितपणे मुख्य सचिवांना त्यांचा कार्य अहवाल पाठवावा.

त्याचबरोबर रुग्णालयांच्या भेटी दरम्यान समितीला सीसीटिव्ही चित्रीकरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.