देशात कोरोनाचा उद्रेक! एका दिवसात दोन लाख रुग्णांची विक्रमी वाढ, देशात पुन्हा लॉकडाऊन?

 

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काही दिवसांपुर्वी दिवसाला एक लाख रुग्ण भेटत होते, पण आता देशात दोन लाख रुग्ण नवे रुग्ण मिळाले आहे. आतापर्यंत एका दिवसात कोरोना रुग्ण मिळालेल्याचा हा सर्वात जास्त आकडा आहे.

कोरोना रुग्णांची वाढ तर होतच आहे. तसेच त्यासोबत रुग्णांच्या मृत्युचा आकडाही वाढत चालला आहे, त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. बुधवारी देशात दोन लाख नवे कोरोना रुग्ण समोर आले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्रीपर्यंत देशात १ लाख ९९ हजार ५६९ नव्या केसेस समोर आल्या आहेत. कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्यापासून आतापर्यंत एका दिवसात इतके रुग्ण मिळण्याचा हा सर्वाधिक आकडा आहे.

तसेच बुधवारी १०३७ कोरोना रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आता देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढून १ कोटी ४० लाख ७० हजार ३०० इतकी झाली आहे. तसेच रिकव्हरी रेट सुद्धा खाली उतरला असून ८९.५१ टक्के इतका झाला आहे.

आतापर्यंत कोरोना संकटामुळे १ लाख ७३ हजार १५२ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. असे असताना केंद्र सरकार कोरोना नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने काही निर्बंधही लादले आहे. पण वाढत्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन हाच एक पर्याय उरला असल्याचे चित्र समोर आहे.

महत्वाच्या बातम्या-

भगव्याला हात लावाल तर दांड्याने ठोकल्याशिवाय राहणार नाही; सेनेच्या वाघाची बेळगावात डरकाळी

माधूरी दिक्षित आणि नोरा फतेहीचा सोशल मिडीयावर धुमाकूळ; दोघींचा डान्स व्हिडीओ व्हायरल

धक्कादायक! कोरोना रुग्णांना पार्सलमधून दारू देण्याचा नातेवाईकांचा कारनामा उघड

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.