कोरोना रुग्णांची चिंता मिटली: नाकात औषध टाकून विषाणूला रोखता येणार; शास्त्रज्ञांचा दावा

वॉशिंग्टन | कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसवर औषध तयार झाले असले तरी त्या औषधावर संशोधन प्रक्रिया सुरू आहे.

अनेक देशातील शास्रज्ञांनी कोरोना व्हायरसवर प्रभावी औषध तयार केले आहे. पण हे औषध सर्वसामान्य जनतेपर्यंत कधी पोहचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता तर अमेरिकेतल्या संशोधकांनी नाकात टाकता येणारे औषध विकसित केले आहे.

हे औषध वापरल्यामुळे शरीरातील कोरोना विषाणूला प्रतिबंध करता येणार आहे. या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आहे. त्याचे चांगले परिणाम दिसून आल्याचे शास्रज्ञांनी सांगितले आहे.

शास्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे औषध जर नाकात टाकले, तर ते श्वसन नलिकेतील व्हायरसला रोखण्यास मदत करते. कोरोना व्हायरस हा बहुतांश वेळा श्वसन नलिकेतून शरीरात प्रवेश करतो असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याला तिथेच रोखता येते असे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, कोरोनावर लस तयार झाली तर ती जगभर पोहोचवायची कशी? हा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक मेगा प्लॅन तयार केला आहे. तो सर्व देशांना दिला जाणार आहे.

या मेगा प्लॅनची अंमलबजावणी सक्तीची नसली तरी तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी ठरणार आहे. कोरोनावर लस आल्यानंतर जगातील सर्वाधिक गरज असलेल्या भागात पोहचावी, त्यानुसार त्याचा क्रम असावा, गरीब देशांनाही ती योग्य वेळेत मिळावी असे आरोग्य संघटनेने म्हंटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध नागरीक, शुगर, ब्लड प्रेशर असे आजार असलेले नागरीक यांना ती लस आधी दिली पाहिजे. असेही आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

ही लस तयार झाल्यावर त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाणार आहे. तसेच ही लस जगातील काना कोपऱ्यात पोहोचवण्यासाठी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट महत्वाची भूमिका बजावणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.