कोरोना रुग्णांना टरबूजातून खर्रा आणि पार्सलमधून दिली जातेय दारू; नातेवाईकांचा प्रताप

यवतमाळ । राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना अनेक ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन असते, ते पुरवण्यासाठी काहीही केले जाते. असाच एक प्रकार यवतमाळमध्ये उघडकीस आला आहे.

टरबुजातून खर्रा तसेच फळांचा ज्युस असल्याचे भासवून पार्सलमधून विदेशी मद्य पाठवण्याचा रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. यामुळे आता प्रशासनाला कपाळावर मारण्याची वेळ आली आहे. यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात हा प्रकार समोर आला.

तल्लफ भागवण्यासाठी हा प्रकार घडवल्याचे समोर आले आहे. रुग्णांना विदेशी मद्य सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे मात्र रुग्ण किती हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.

मद्य पाठवताना कोणाला समजू नये म्हणून ते फळांचे ज्युस किंवा घरचे जेवण आहे, असे वाटावे या पद्धतीने पॅकेटमध्ये रॅप करुन पार्सल दिले होते. मात्र सुरक्षा रक्षकांनी ते पार्सल उघडून पाहिले आणि यामध्ये दारू असल्याचे उघड झाले.

या प्रकरणानंतर मात्र हॉस्पिटल प्रशासनाकडून कडक तपासणी करण्यात आली. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असताना अशा घटना चिंतेत भर टाकणाऱ्या आहेत. लॉकडाऊन करण्यात आले असले तरी काळजी घेणे गरजेचे आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.