कोरोना पेशंटच्या डेडबाॅडीवरील कपडे चोरून त्यावर ब्रॅण्डेड कंपन्यांचे लोगो लावून विकणाऱ्या टोळीला अटक

कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कोरोनामुळे मृत पावणाऱ्या रुग्णांच्या संख्येत पण मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. शमशान घाटावरील मृतदेहांचे लेबल टाकून विकणाऱ्या टोळीचा पदार्फाश बडौत पोलिसांनी केला आहे.

पोलिसांनी पकडण्यात आलेल्या टोळीमधील सात जणांकडून मोठ्या प्रमाणावर कपडे जप्त करण्यात आलेले आहेत. यासंदर्भातील अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

बडौत पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक अजय शर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे. रविवारी लॉकडाऊनमध्ये गाडीची तपासणी चालू असताना एका गाडीत मोठ्या प्रमाणावर कपडे सापडले.

पोलिसांनी यावेळी गाडीतील कपड्यांचे कागदपत्रे आणि आणि बिल मागितली पण गाडीत बसलेल्या कोणाकडेच यातील काहीच नव्हते. पोलिसांनी यावेळी पोलिसीस खाक्या दाखवताच गाडीतील लोकांनी मृतांच्या शरीरावरील कपडे चोरून विकत असल्याची कबुली दिली.

गाडीतील लोकांनी यावेळी मृतांच्या शरीरावरील कपडे काढून विकत असल्याचे सांगितले आणि नंतर त्यावर ब्रँडेड कपड्यांचा लोगो टाकत होते. त्यांच्याकडे ५२० मृतदेहावर टाकण्यात येणाऱ्या चादरी, १२७ कुर्ते, १४० पॅण्ट, ३४ धोतरं, १२ गरम शाली, ५२ साड्या, तीन रिबिन्सची पाकिटं, १५८ ब्रॅण्डेड कपड्यांचे स्टीकर्स सापडले आहेत.

पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास केला असता दोन वर्षांपासून त्यांचा कपडे विकण्याचा धंदा चालू असल्याचे म्हटले आहे. मागच्या वर्षी पण त्यांनी असा उद्योग केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना तुरुंगात टाकले आहे.

कोरोनामुळे घरातील चौघांचा मृत्यू, मुलाच्या जाण्याचा धक्का सहन न झाल्याचे आई-वडिलांचाही मृत्यू
कोरोना काळात डबल मास्क वापरणे किती फायदेशीर? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.