कोरोनाची लागण झाली अन्  बरा होताच  झाला  करोडपती, वाचा संपुर्ण किस्सा

ठाणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाने रुग्णांचा मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. देशात भयानक परिस्थीती निर्माण झाली आहे. रुग्ण उपचार घेण्यासाठी हॉस्पीटलमध्ये भरती होतात. मात्र तिथेही दुर्देवी घटना घडून रुग्ण प्राण गमावत आहेत.

देशात कोरोना रुग्णांसाठी आरोग्य कर्मचारी, डॉक्टर जीवाची बाजी लावून काम करत आहेत. कोरोनातून उपचार घेऊन रुग्ण बरेही होत आहेत. आपला रुग्ण कोरोनावर मात करून बरा होऊन घरी आल्यानंतर कुटूंबांमध्ये आनंदाचे वातावरण असते.

ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात राहणाऱ्या राजकांत पाटील  नावाच्या व्यक्तीने कोरोनावर मात केली. आणि घरी आल्यानंतर त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की आपण करोडपती होणार आहे. त्यांना घरी आल्यानंतर कळलं की तब्बल ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे.

राजकांत पाटील यांचा पत्नी, आई, दोन लहान मुले असा छोटासा परिवार आहे. त्यांनी डियर लॉटरीज बैसाखी बंपर २०२१ जिंकली आहे. त्यामूळे त्यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कोरोनातून बरं होऊन घरी आल्यानंतर त्यांना या लॉटरी कंपनीचा मॅसेज आला.

त्यांनी डियर लॉटरी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना सांगण्यात आले की तुम्हाला ५ कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. काही वेळ त्यांना यावर विश्वासच बसला नाही. मिळणाऱ्या पैशातून चांगली कामे करण्याचा आणि स्वत:चा व्यवसाय मोठा करण्याचं राजकांत पाटील यांनी ठरवलं आहे.

दरम्यान ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनूसार देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ इथवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासामध्ये देशात २,१०४ कोरोना रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या देशात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या २२ लाख ९१ हजार ४२८ आहे.
महत्वाच्या बातम्या-
“दोन कानाखाली लावेल”; आईसाठी ऑक्सिजन मागणाऱ्या मुलाला भाजप खासदाराची धमकी
एकेकाळी फुगे विकायचा MRF कंपनीचा मालक, आज आहे भारतातील सगळ्यात मोठी टायर बनवणारी कंपनी
मुंबईचा ऑक्सिजन मॅन! २२ लाखांची गाडी विकून आलेल्या पैशातून गरीबांना मोफत ऑक्सिजन वाटप

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.