रुग्णालयातच परीक्षेची तयारी करतोय कोरोना रूग्ण, त्याच्या जिद्दीचे कलेक्टरनेही केले कौतूक; म्हणाले..

देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेकांना परीक्षा देऊनही कुठे नोकरी उपलब्ध नाही. कोरोनाने यामध्ये कोणालाही माफ केले नाही.

या काळात विद्यार्थ्यांचे फारसे लक्ष अभ्यासाकडे नाही. मात्र याला काहीजण अपवाद आहेत. ओडिसाधील एका विद्यार्थ्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा विद्यार्थी रुग्णालयात अभ्यास करताना दिसत आहे.

या तरुणाच्या बेडवर पुस्तकासह इतर गोष्टी आहेत. चार्टड अकाऊंटसच्या परीक्षेची तयारी हा विद्यार्थी करत आहे. जंगम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विजय कुलंगे हे या ठिकाणी भेट देण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना हे चित्र दिसले.

त्यांनी ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. ते म्हणाले, यश हा योगायोग नाही, आपण समर्पण करणे गरजेचे आहे. ते म्हणाले मी कोरोना रुग्णालयाला भेट देण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ही व्यक्ती अभ्यास करताना दिसली. अनेकांनी या फोटोवर लाईक आणि कमेंट्स केल्या आहेत.

सध्या देशात सगळीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. यामुळे अनेकांचे भविष्याचे नियोजन विस्कटले आहे. अनेकांचे शिक्षण, रोजगार, उद्योग यांचे मोठे नुकसान झाले आहे.

लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्याचे दोन वेळचे जेवण सुध्दा उपलब्ध होत नाही. यामुळे देशात परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अजून काही दिवस परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

या गावाची राज्यात चर्चा! गावात ‘घर तिथे ऑक्सिजन बेड’चा ग्रामपंचायतीचा निर्णय

…तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली की, “हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला”

‘या’ हॉलीवूड अभिनेत्याने केले होते शिल्पा शेट्टीला सगळ्यांसमोर जबरदस्ती किस; प्रकरण गेले कोर्टात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.