कोरोना रुग्णांवर संत्र्याच्या बागेत उपचार; झाडाच्या फांद्यांना अडकवून देतोय सलाईन

अनेक ठिकाणी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नाहीत. मध्य प्रदेश राज्यातील आगर मालवा जिल्ह्यामध्ये एक नवीन प्रकार समोर आला आहे. त्या ठिकाणी संत्र्यांच्या बागेमध्ये कोरोना रुग्णांवर डॉक्टरवर अजब गजब उपचार चालू केले.

एका बनावट डॉक्टरने रुग्णांवर मोसंबीच्या बागेत उपचार चालू केले आहेत. झाडाच्या फांद्यांना लावून तो रुग्णांना ग्लुकोज पण देत आहे. जेव्हा येथील व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिली तेव्हा हा बनावट डॉक्टर गायब झाला.

सरकारी अधिकारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथून डॉक्टर पळून गेला होता. अधिकाऱ्यांना घटनास्थळी सिरिंज आणि औषधांची अर्धवट जळालेली बिले पण मिळाली आहेत.रुग्ण पण जमिनीवर कार्डबोर्डवर झोपलेल्या अवस्थेत उपचार घेत होते.

अधिकाऱ्यांना घटनास्थळी कार्डबोर्ड अंथरून महिला झोपलेल्या दिसल्या. झाडांना अडकवलेल्या सलाईनमधून महिलांना ग्लुकोज देण्यात येत असल्याचे पण दिसून आले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावत आहे.

ब्लॉक मेडिकल ऑफिसर असणाऱ्या मनीष कुरील यांनी बीबीसीशी बोलताना डिग्री नसताना अशाप्रकारे लोकांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर आम्ही कारवाई करत असल्याचं सांगितल.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.