कुटुंबानेच कोरोना रुग्णाचा मृतदेह फेकला नदीत?; धक्कादायक व्हिडिओ होतोय व्हायरल

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. रोज हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे. तर अनेक धक्कादायक घटनाही घडत असून त्याचे व्हिडिओ पण इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

काही आठवड्यांपुर्वी गंगा नदीत कोरोना रुग्णांचे मृतदेह आढळून आले होते. तसेच याचे अनेक हृदयद्रावक फोटो व्हायरल झाले होते. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एक कर्मचारी कोरोना रुग्णाचे मृतदेह नदीत फेकताना दिसून येत आहे.

ही घटना उत्तर प्रदेशच्या बलमापुर गावात घडली आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन युवक मिळून एका मृतदेहाला नदीत फेकत आहे.

हा पुल कोतवाली नगर क्षेत्रातील राप्ती नदीवरील आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेला मृतदेह सिद्धार्थनगरमध्ये राहत असलेल्या प्रेमनाथ मिश्रा यांचा आहे, असे सीएमओ डॉ. विजय बहादूर सिंग यांनी सांगितले आहे.

२८ मे रोजी प्रेमनाथ यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर कोरोना नियमांचे पालन करत त्यांचा मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला होता, असेही विजय बहादूर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये दोन तरुण असून त्यामध्ये एका तरुणाने पीपीई कीट घातलेला आहे. दोघे मिळून त्या मृतदेहाला नदीत फेकत आहे. या प्रकरणी कोतवाली नगरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंटीमेट सीन करताना मिथून चक्रवर्तीने ‘या’ अभिनेत्रीला केला होता वाईट पद्धतीने स्पर्श
राजेश खन्नाचा खुप मोठा फॅन होता ‘हा’ अभिनेता; त्यांना भेटण्यासाठी बनला होता इलेक्ट्रिशीयन
“औरंगजेबाला स्वप्नात जसे शिवाजी महाराज दिसायचे, तसे चंद्रकांत पाटलांना अजित दादा दिसतात”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.